सिरोंचा : तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष श्री रवी सल्लम यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री रवी सल्लम हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून, त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सक्रिय कामकाजाची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.निवड जाहीर होताच तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी श्री सल्लम यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी काळात तालुक्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया श्री सल्लम यांनी यावेळी व्यक्त केली.दरम्यान, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.







