संपादक / सागर मुलकला
एटापल्ली, दि. ३ मे २०२६ :राजीव गांधी शाळा, एटापल्ली येथे आज आदिवासी विकास विभाग भामरागड प्रकल्प चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षपदी चेद् किष्टया येतम, उपाध्यक्षपदी सुरेश भंडारी, सचिवपदी श्रीनिवास लिंगया अग्गुवार तसेच सदस्यपदी अशोक सत्यनारायण येतम यांची निवड करण्यात आली.या नियुक्ती कार्यक्रमाला आदिवासी विकास विभाग अहेरी प्रकल्प चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश जाकावर, गडचिरोली प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष जितू भाऊ दोडके, नागपूर विभाग अध्यक्ष श्री तुरकरवार सर, तसेच तलमले सर आणि जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती येमनी रामटके यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमादरम्यान नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी हक्क, समस्या व कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.







