सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथील चेक पोचम्मा देवी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून नवीन बोअरवेल उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. नुकतेच पोचम्मा देवी मंदिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला होता. मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ होत असल्याने पाण्याची सुविधा आवश्यक होती. ही गरज लक्षात घेऊन आमदार आत्राम यांनी तत्काळ बोअरवेल मंजूर केली. या भूमिपूजनामुळे मंदिर परिसरासह गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, गावकऱ्यांनी आमदार आत्राम यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे. भविष्यातही अशा विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, मंदिर समिती सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







