सागर मुलकला / संपदक
मोयाबीनपेठा ग्राम पंचायत अंतर्गत विविध समस्यांवर आज सिरोंचा येथे शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद दि. 09 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता विश्राम गृह, सिरोंचा येथे पार पडणार आहे.या पत्रकार परिषदेत ग्राम पंचायत क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या, नागरिकांच्या अडचणी तसेच स्थानिक प्रश्नांवर भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते संतोष चंदावार यांनी दिली आहे.सदर पत्रकार परिषदेस सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.







