संपादक / सागर मुलकला
गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक एम.रमेश यांचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदिच्छा भेटीदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेसह विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.!यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी एम. रमेश यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत गडचिरोली जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था व जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाने समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.!नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विविध स्तरातून त्यांचे स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.!!







