सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री Dr. Dharmaraobaba Atram यांचा दिनांक 14 मे ते 16 मे 2026 दरम्यान सिरोंचा तालुक्याचा दौरा आयोजित करण्यात आला असून विविध सामाजिक, शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट)चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिरोंचा तालुका अध्यक्ष Madhukar Kolluri यांनी केले आहे.प्राप्त दौरा कार्यक्रमानुसार गुरुवारी (14 मे) सकाळी नागपूर येथून आदिलाबादकडे प्रयाण करून तेथे चि. ओंकार ओल्लालवार यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी सिरोंचात आगमन होणार असून आसरअली येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. तसेच शकिल हुसेन यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमालाही ते भेट देणार आहेत.शुक्रवारी (15 मे) मौजा सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन तसेच राजराजेश्वरी फॅन्शन हॉल येथे आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. यानंतर मौजा आरडा येथे आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडी उद्घाटन कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.शनिवारी (16 मे) सकाळी सिरोंचा येथून राजवाडा अहेरीकडे प्रयाण करून दौऱ्याची सांगता होणार आहे.या दौऱ्यामुळे सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध कार्यक्रमांच्या तयारीला वेग आला आहे.







