सागर मुलकला ✍️ संपादक,
सिरोंचा : मानवतावादी व अध्यात्मिक गुरु यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त हार्ट ऑफ लिविंग परिवार सिरोंचा यांच्या वतीने शहरात विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सिरोंचा शहरातील नागरिकांना प्रसादाच्या स्वरूपात थंडगार माट्टा (ताक) वितरण करण्यात आले.उन्हाच्या तीव्रतेत नागरिकांना दिलासा मिळावा तसेच समाजात सेवा, प्रेम व मानवतेचा संदेश पोहोचावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील विविध भागात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने माट्टाचा लाभ घेतला.या कार्यक्रमात नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश बोगे यांच्या हस्ते नागरिकांना माट्टा वाटप करण्यात आले. यावेळी नगर सेवक सतीश राचर्लावार, ऍडव्होकेट चिट्यावार, समीर अरिगेला, येरोला, अमित त्रिपाठी, श्रीधर अनकारी आदी हार्ट ऑफ लिविंग परिवाराचे सदस्य उपस्थित होते.हार्ट ऑफ लिविंग परिवाराच्या सदस्यांनी श्री श्री रविशंकरजी यांच्या शिकवणुकीनुसार समाजसेवा, शांतता व मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या उपक्रमास शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून अनेकांनी परिवाराच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.







