संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : शिवसेना ओ.बी.सी विभागाच्या शहर प्रमुखपदी रविकांत सत्यनारायण बुर्रावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना ओ.बी.सी विभागाचे जिल्हा प्रमुख नरेंद्रभाऊ कंदिकुस्वार यांनी प्रदान केले.ही नियुक्ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रवीण डोंगळे यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.रविकांत सत्यनारायण बुर्रावार यांच्यावर शिवसेना ओ.बी.सी विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच ओ.बी.सी समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.






