संपादक / सागर मुलकला ✍️
सिरोंचा : तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आणखी एका डिजिटल माध्यमाची भर पडत असून “त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस” या न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनलचे लोकार्पण आज सिरोंचा येथील आवास येथे सकाळी ९.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.या पोर्टलचे लोकार्पण माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मा. सतीश बोगे, राष्ट्रवादी सेवादल तालुकाध्यक्ष ओमकार ताटिकोंडावर, पत्रकार अमित तिपट्टी, ज्येष्ठ पत्रकार नागभूषणंम जी शावकार तसेच “त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस”चे मुख्य संपादक सुरेश तिपट्टीवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी “त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस” या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक घडामोडी व जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमादरम्यान डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी “त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस”च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी अभिनंदन केले.







