सागर मुलकला / ✍️ संपादक
सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली ग्रामपंचायतीची नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, आज उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बंडे गावडे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.ही निवडणूक प्रक्रिया *माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम* यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बनाय्या जनगाम, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, शहराध्यक्ष रवी सुलतान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्याने पक्षाला यश मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.यावेळी कार्यकर्ते म्हणून लक्ष्मण राम वेलादी, रवी सनी वेलादी, शंकर मासा गावडे, मल्ला लच्छा वेलादी, पद्मा लिंगोलो मुंजाम, सुशीला मला वेलादी, लक्ष्मण माध वेलादी, नाना राजा मुंजा, लच्छा पोहोचा गावडे आदी उपस्थित होते.उपसरपंचपदी बंडे गावडे यांच्या निवडीमुळे बेज्जूरपल्ली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







