सिरोंचा प्रतिनिधी / सागर मुलकला
सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत नवनियुक्त नगराध्यक्षा पद्माताई सतीश भोगे यांनी प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होताच नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांनी नगर पंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी समस्येचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर नगर पंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून आज सकाळपासूनच प्रभाग क्रमांक ४ मध्ये जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले आहे.यावेळी जुनी जलवाहिनी दुरुस्त करण्यासोबतच नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पुढील २४ तासांत प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.या पाहणीवेळी नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक नरेश अलोने, रोहित पिल्लीवार यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तातडीने समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांचे आभार मानले.







