सिरोंचा तालुक्यातील माणिकांता स्वामी तोगारी यांच्या आकस्मिक निधनामुळे तोगारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेची माहिती मिळताच *माजी मंत्री तथा* *आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम* यांनी संवेदनशीलता दाखवत कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.यावेळी दिवंगत माणिकांता स्वामी तोगारी यांच्या पत्नी जया तोगारी यांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी रमेश शंकर मानेम, सत्यानारायण परपाटला, सत्यम चिलकमरी, तिरुपती मिट्टा, निलम मराना आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तोगारी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. तसेच अशा कठीण प्रसंगी आपण कुटुंबासोबत कायम उभे असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.







