*
सिरोंचा तालुक्यातील पापय्यापल्ली गावातील नागरिक अर्जन्ना लस्मय्या राल्लाबंडी यांचा दुर्दैवी आकास्मित मृत्यू झाला. टूव्हीलरने प्रवास करत असताना वाहनावरील अकस्मात मृत्यू झाल्याची माहिती आहे,घटनेची माहिती गावातील कार्यकर्त्यांनी *आमदार डॉ.राजे धर्मरावबाबा आत्राम* यांच्यापर्यंत पोहोचविली. या घटनेची दखल घेत *आमदार राजे डॉ धर्मराव बाबा आत्राम* यांनी मृताच्या कुटुंबियांना पत्नी ज्योती अर्जन्ना राल्लाबंडी यांच्याकडे आर्थिक सहाय्य प्रदान केले तसेच कुटुंबियांचे सांत्वन व्यक्त केले.त्यावेळी राजेश पिडुगु, राजेशाम शेट्टीवार, रमेश मानेम आदी उपस्थित होते.या मदतीमुळे दुःखद प्रसंगात कुटुंबियांना दिलासा मिळाला असून *आमदार डॉ राजे धर्मराव बाबा आत्राम* यांच्या संवेदनशील भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.







