संपादक/ सागर मूलकला
सिरोंचा तालुक्यातील आईपेठा गावालगत असलेल्या शेत परिसरात अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. शेत आणि जंगल परिसराला आग लागल्यामुळे काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. गावाभोवती चारही बाजूंनी आग पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.उन्हाचा प्रचंड तडाखा आणि वाऱ्यामुळे आगीने वेगाने फैलाव घेतला. गावालगत असलेल्या शेती क्षेत्रासह जंगल भागात मोठ्या प्रमाणात आग तांडव करत असल्याने गावकऱ्यांची धावपळ उडाली. परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून आईपेठा गावातील युवकांनी तत्काळ पुढाकार घेतला.भर उन्हात जीवाची पर्वा न करता युवकांनी झाडांच्या फांद्या, पाणी व इतर साधनांच्या मदतीने आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर युवकांना आग नियंत्रणात आणण्यात यश आले. युवकांच्या तत्परतेमुळे गावावर ओढवणारी मोठी दुर्घटना टळली असून गावातील घरे, शेती व जंगलाचे मोठे नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.या धाडसी कार्याबद्दल गावातील नागरिकांकडून युवकांचे कौतुक करण्यात येत असून प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







