प्रतिनिधी : सागर मूलकला | पब्लिक समाचार न्यूजसिरोंचा, दि. ६ जून : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नारायणपूर (ता. सिरोंचा) येथे शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करत स्वाभिमान, स्वातंत्र्य, न्याय आणि लोककल्याणाच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांचे राष्ट्रप्रेम, धैर्य, संघटन कौशल्य व रयतेप्रती असलेली बांधिलकी यांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. तसेच शिवरायांचे विचार आणि आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात आला.कार्यक्रमास शिवसेना ओबीसी विभाग तालुका प्रमुख सिरोंचा शिंदे साहेब, येलायाभाऊ मोरे, युवा सेना तालुका प्रमुख प्रशांतभाऊ नस्कुरी, ओबीसी विभाग अध्यक्ष नारायणपूर, राजशेखर भिमकरी (शिवसेना उपाध्यक्ष), जेगदिश एदुरु (शिवसैनिक), गाटटु साला (शिवसैनिक), वेंकटेश नुहेटी (शिवसैनिक) यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,







