सिरोंचा : सिरोंचा शहरातील रहिवासी श्री. चंद्रकांत समया सिलामवार (वय ३६) हे सध्या रक्तविकाराशी संबंधित गंभीर आजार इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया (ITP) वर उपचार घेत असून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होत असल्याने त्यांच्या कुटुंबास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पद्माताई सतीश भोगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री. चंद्रकांत सिलामवार यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत प्रदान केली. यावेळी उपस्थितांनी रुग्णाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.या प्रसंगी नगरसेवक सतीशभाऊ भोगे, शहराध्यक्ष रवी सुलतान, युवा नेते कौशिक भोगे, संदीप दगाम, लक्ष्मण पेदापल्ली, सदाशिव दगाम, प्रवीण तसेच हेमंत आदी मान्यवर उपस्थित होते.नगराध्यक्ष पद्माताई भोगे यांच्या या मदतीमुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून गरजू कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.







