सिरोंचा, प्रतिनिधी : पेंटीपाका गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर दि. १८ जून रोजी वादळी पावसामुळे पडलेली झाडे सहा दिवस उलटूनही हटविण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पुलगम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, अपघात झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.







