सिरोंचा, प्रतिनिधी -सागर मूलकला : वट पौर्णिमेच्या पावन निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, अंकिसा, आसारअल्ली तसेच परिसरातील विविध गावांमध्ये विवाहित महिलांनी वडाच्या वृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केली.पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून वडाच्या झाडाजवळ एकत्र येत धार्मिक विधी पार पाडले. वडाच्या वृक्षाला दोरा गुंडाळून पूजा-अर्चा करण्यात आली. तसेच वटसावित्रीची कथा श्रवण करून महिलांनी एकमेकींना वट पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.सिरोंचा, अंकिसा व आसारअल्ली येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सण साजरा करण्यात आला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत महिलांनी श्रद्धेने वट पौर्णिमेचे व्रत पाळले. या निमित्ताने गावांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडले.







