सिरोंचा (प्रतिनिधी )सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गरकापेठा येथील रहिवाशी *राजन्ना कोंडागोर्ला* यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता.ही माहिती मिळताच *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी गरकापेठा गावात जाऊन मृतक कुटुंबाला भेटून कुटुंबातील व्यक्तीला आर्थिक मदत केली.या मदतीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.राजन्ना कोंडागोर्ला यांचे काही दिवसांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठा आर्थिक व मानसिक आघात झाला होता. ही बाब लक्षात घेऊन *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी आर्थिक मदत केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुटुंबियांचे सांत्वन करत, पुढील काळातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.*याप्रसंगी सरपंच सूरज गावडे, राजेश पडाली, रवी दुर्गम, सुधाकर दुर्गम, राजन्ना दुर्गम, सत्यम कुम्मरी, महेश कावरे, शंकर दुर्गमसह* गरकापेठा गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







