सागर मूलकला / सिरोंचा
सिरोंचा, प्रतिनिधी : युवा नेते ऋतुराज हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, वृक्षारोपण तसेच राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबवून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून करण्यात आली. यावेळी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे वाहनचालकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी मदत होणार असून नागरिकांनी या सामाजिक कार्याचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.यावेळी युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी वाढदिवस हा केवळ आनंदोत्सव नसून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी असल्याचे सांगितले.या उपक्रमात नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, विजय रंगुवार, सिद्दिक अली, सुरेश कंबागोनी, एम. डी. शानू, सलाम सातार, समीर आरिगेला, इस्माईल शेख (दादाभाई), मयुर पुपलवार, संदीप गागापुरपू, विजय तोटा, सादिक भाई, संदीप घंटावर, सुजल कमलवार, राजेश बद्दी (चांटी सर), साईकुमार घंटावर, सलमान शेख, स्वप्नील तोकाला, देवया येनगंदूला तसेच ऋतुराज हलगेकर मित्र परिवार, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







