सागर मूलकला, सिरोंचा
सिरोंचा, प्रतिनिधी : सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेची मासिक बैठक रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, सिरोंचा येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत पत्रकारांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून संघटनेच्या आगामी उपक्रमांचे नियोजन तसेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी वेळेवर उपस्थित राहून बैठकीस सहकार्य करावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष सागर मूलकला यांनी केले आहे.तसेच संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांची उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीस तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सचिव अशोक कुम्मरी यांनीही केले आहे.







