सागर मूलकला/ संपादक सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रांवरील १० हजार क्विंटलची उद्दिष्ट मर्यादा वाढविण्यासह धान खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.सध्या अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी प्रलंबित असून, उद्दिष्ट मर्यादा पूर्ण झाल्यामुळे खरेदी थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान खरेदी होईपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू ठेवावी. तसेच १० हजार क्विंटलची मर्यादा वाढवून धान खरेदीस किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचे धान विक्रीविना राहणार नाही.यासंदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.







