प्रतिनिधी – सागर मूलकला. सिरोंचा
सोमनपल्ली, दि. ९ ऑगस्ट २०२६ :सोमनपल्ली येथे रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी पारंपरिक बोबलपोचम्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला.गावातील सर्व गाय, बैल, बकरी तसेच लहान मुले व नागरिक सुखरूप व निरोगी राहावेत, गावात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि परिसरात चांगला व समाधानकारक पाऊस पडून शेतीला पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी बोबलपोचम्माची पूजा-अर्चना करण्यात आली.यावेळी गावाच्या सुख-समृद्धीसह पशुधनाचे आरोग्य चांगले राहावे, शेतीला भरघोस उत्पन्न मिळावे आणि गावात शांतता व आनंद नांदावा, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पारंपरिक श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा जपत गावकऱ्यांनी हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा केला.







