प्रतिनिधी – सागर मूलकला, सिरोंचा
सिरोंचा : अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेच्या गंभीर घटनेप्रकरणी आदिवासी गोंडवाना गोंडूल समिती, सिरोंचा यांच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात समितीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्याची प्रत सिरोंचा तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, ता. धानोरा, जि. गडचिरोली येथील अनुदानित आश्रमशाळेत झालेली विषबाधेची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या विद्यार्थ्यांवर योग्य व दर्जेदार उपचार करण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी आणि पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना न्याय व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आदिवासी गोंडवाना गोंडूल समिती, सिरोंचा यांच्या वतीने करण्यात आली आहे.सिरोंचा | प्रतिनिधी







