सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशी सिरोंचा कोत्तागुडाम येथे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णाकुमार चोक्कमवार, तालुका अध्यक्ष सागर मूलकला, उपाध्यक्ष मनोज कुम्मरी, युवक अध्यक्ष अजय सोन्नारी, राजू मूलकला, पोचम संगेम, श्रावण पुल्लुरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.







